
मी निशा चंद्रशेखर म्हापणकर, लहानपणा पासूनच मला लिहिण्याची आवड आहे. मी एक सामान्य गृहिणी आहे, माझा संसार हेच माझे जग, जीवनाची गाडी सरळ रुळावरुन चालण्यासाठी, फक्त संसार हेच लक्ष्य ठेवलं, पण मनातून लिहिण्याची उर्मी मी थांबवू शकले नाही. कामं करता करता मनातलं कागदावर धावलं ते लिहिता गेली वीस वर्षे माझ्या कथा विविध मासिकातून तसेच दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
